मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरू झालेला सोलापूर जिल्ह्यातील वांगीच्या खडाखडे कुटुंबातील वाद सरपंच आणि पोलिस पाटीलकी ही दोन्ही पदे गमावल्यानंतरच संपला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली. या निवडणुकीत खडाखडे कुटुंबातील सोनाबाई खडाखडे आणि सीताबाई खडाखडे आमने-सामने होत्या. त्यात सीताबाई खडाखडे विजयी होऊन सरपंचपदी विराजमान झाल्या.
आईचा पराभव झाल्याने धरेपा खडाखडे यांनी सरपंच सीताबाई यांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याने सरपंचपद रद्द करण्याची तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सीताबाई खडाखडे यांचे पद रद्द ठरवले.
सीताबाई खडाखडे यांचे पद गेल्याने दुखावलेल्या त्यांच्या मुलाने सुरजने १४ महिन्यांपूर्वी पोलिस पाटीलपद मिळालेल्या धरेपाविरोधात जात प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दिली.
प्रांताधिकाऱ्यांनी धरेपाला वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची नोटीस बजावली. सुनावणीदरम्यान धरेपाने प्रमाणपत्र सादर न केलेल्या सर्वांनाच अपात्र ठरवण्याची मागणी प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे केली.
त्यामुळे धरेपा यांच्याबरोबर मनगोळीच्या पोलिस पाटील अश्विनी घंटे यांनाही पोलिस पाटील पद गमवावे लागले.
भावकीच्या वादातून खडाखडे कुटुंबाने मिळालेली दोन्ही पदे गमावली. एकाचवेळी एकाच कारणाने महिनाभरात दोन्ही पदे गमावण्याची दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज