टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे.
राज्यातील काही भागात रखरखतं ऊन आणि काही भागात अवकाळी पाऊस असं काहीसं विचित्र वातावरण सध्या राज्यात आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर काहीही परिणाम होणार नसल्याचं पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 13 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
तर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. तसेच मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही भागात 13 मे पर्यंत अवकाळी पावसाची उपस्थिती असेल.
तर अकोला व अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज