मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे . गुरुवारी दिवसभरात सोलापुरातील जुन्याच ७ हॉटस्पॉट भागात २१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यात १४ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे , अशी माहिती प्रशासनाने गुरुवारी दिली.
सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढतच चालल्यामुळे चिंता वाढली आहे . बुधवारी १३ तर गुरुवारी २१ रुग्ण आढळले . विशेष धक्कादायक बाब म्हणजे यात ७ ते १२ या वयोगटातील सात मुले आहेत . शहरातील हॉटस्पॉटमध्येच हे रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये शास्त्री नगरमध्ये : ९ , उत्तर सदर बझार . १ , कुर्बान हुसेन नगरः२ , नई जिंदगी : ३ , शनिवार पेठः१ , – शानदार चौक आणि मोदी : ४ अशी रुग्णसंख्या आहे . शास्त्री नगर , मोदी . नई जिंदगी आणि कुबनि हुसेन नगरात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नव्याने आढळलेले हे रुग्ण पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते . या ठिकाणी त्यांचे स्वब घेतल्यावर पॉझिटिव्ह आले आहेत . त्यामुळे त्यांना आता उपचारासाठी आयसोलेशनमध्ये हलविण्यात आले आहे.
संपर्कातील व्यक्तींना लागण यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणच्या व्यक्तींना केगाव येथील निरीक्षण कक्षात दाखल करण्यात आले आहे . त्यातील २० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे , तर एक शास्त्री नगरातील तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर पॉझिटिव्ह आला आहे.
——————–ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज