मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अल्पवयीन मुले दुचाकी गाडी चालविण्याचे प्रमाण वाढत असल्याने याला नियंत्रीत करण्यासाठी पोलीस प्रशासन कारवाईसाठी सरसावले असून यापुढे जी अल्पवयीन मुले गाडी चालविताना निदर्शनास येतील त्यांच्या पालकावर खटले दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिला आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात दुचाकी चालवितानाचे चित्र आहे.
दरम्यान १८ वर्षाच्या आतील मुलांना दुचाकी चालविणे कायदयाने गुन्हा मानला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची असून १८ वर्षाच्या आतील मुलांना गाडी चालविण्यासाठी देवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
शाळेमधील बरीचशी मुले दुचाकीवर येता-जाता दिसत आहेत. परिणामी या मुलांना वाहतूकीचे कुठल्याही नियमाचे ज्ञान नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मोटार व्हेईकल अॅक्टप्रमाणे १८ वर्षाच्या पुढील लायसन्स धारक मुले, मुली केवळ गाडी चालवू शकतात असा नियम आहे. आज मंगळवेढा शहरात बरीचशी मुले वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी हाकत असल्याचे दिसून येत आहे.
यापुढे सर्व पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात गाडी देवून कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा संबंधीत पालकावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज