मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब राजाराम माळी यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून पाठवल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून पंढरपूर येथील तानाजी कोळी आणि बाळासाहेब माळी यांचे पुतणे प्रदीप माळी हे सर्व कामकाज पाहत होते.
या दोघांनी आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाईड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवार रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुप वर टाकली.
कोळी यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमबाजीला कंटाळून मी कुटुंबासह आत्महत्या करीत आहे, मी खूप लांब आलो आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा मेसेज असा संदेश व्हाट्सअप ग्रुप वर टाकून ते आपल्या परिवारासह बेपत्ता झाले आहेत.
बाळासाहेब यांनी व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकलेला संदेश मी आत्महत्या करीत आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. लांब आहे. शेवटचा मेसेज, माझा विश्वासघात केला आहे.
मॅनेजर श्री. तानाजी कोळी पंढरपूर व माझा पुतण्या श्री. प्रदीप माळी या दोघांनी मला व माझ्या पत्नीला विश्वासात घेऊन माझे दत्तकृपा पेट्रोलियम भोसे हे दोघे विश्वासू म्हणून बघत होती.
माझा व माझ्या पत्नीचा स्वभावाचा फायदा घेऊन यांनी रुपये एवढी फसवणूक केली आहे. मी जमीन विकून व सांगोला अर्बन बँकेतून कर्ज घेऊन पंप चालू केला. हे दोघे माझ्या विचारले की काही अडचण नाही, आम्ही प्रामाणिकपणे करीत आहे, असे सांगायचे.
एका महिला व्यवसायिकीची फसवणूक झाली आहे. माझी पत्नी सौ. सुरेखा माळी, भोसे अचानक भांडवल पडले त्यामुळे पंप बंद पडल्यानंतर एक दिवशी माझ्या लक्षात आली व मी सीए जोशी, पुणे यांच्याकडून हिशोब बघितला असता मला धक्का बसला तरी यांनी आम्ही सात (७) सात लाख घेतली असताना बोगस लिहून तरीही यांच्याकडे. ९९ लाखाला फसवले आहे व त्यामुळे बँकेला पंधरा लाख व्याज गेले आहे.
असे सर्व मिळून एक कोटी एकवीस लाख रुपये फसवणूक झाली आहे (यात काही रक्कम वाढू शकते किंवा थोडी कमी होऊ शकते) वरून मला तानाजी कोळी म्हणतो की, मी व माझ्या ग्रुपने मिळून तीन खून केले आहेत, पाच हप मर्डर व कित्येक लोकांना मारले आहे. माझ्याविरुद्ध कोणीही तक्रार देऊ शकत नाही.
त्यामुळे मला व माझ्या परिवाराला व पंपावरती कर्मचाऱ्यांच्या जीवितस धोका आहे. कोळीने आत्तापर्यंत ज्या पंपावर काम केले आहे त्यांना फसवले आहे. गुप्तपणे माहिती घ्यावी. समोर येण्यास कोणी तयार नाही. दारू पिऊन रात्री अचानक पंपावरती येतो.
यातून मी सावरत नाही, म्हणून माझ्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय नाही. तरी आपण व इतर संबंधिताची मदत घेऊन माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा ही परमेश्वर आपल्या परिवाराची कल्याण करेल विनंती..
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज