मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूलमंत्री तथा आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी राज्यात वाळू धोरण जाहीर केले होते. अवघ्या ६०० रुपयांत वाळू दिली जाईल असे सांगण्यात आले, सोमवारच्या दौऱ्यात सोलापुरातील वाळूबाबत घोषणा होईल असे वाटत होते. मात्र, त्यांचा निर्माण झाला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाळू धोरण जाहीर केल्यानंतर एक महिन्यात त्यांचा मतदारसंघ असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात, अंमलबजावणी झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिक येथेही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दरम्यान, ते सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. नियोजित दौऱ्यात वाळू डेपो व गौण खनिज धोरण अंमलबजावणी आढावा बैठक घेणार होते.
सोमवारी सकाळपर्यंत सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांपासून बिल्डरपर्यंत सर्वांनाच बैठकीत जाहीर होणाऱ्या घोषणेची उत्सुकता होती.
मात्र, दौरा रद्द झाल्याने पुन्हा सोलापूरच्या वाळू धोरणाचा प्रश्न कायम राहिला आहे. वाळूचा दर जर पाहिला तर तो एका ब्रासला ८ ते १० हजार रूपये इतका चालत होता.
मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालत होता बेकायदा व बेसुमार वाळू उपसाशिवाय त्याची चढया दाराने विक्री यामुळे एक प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू झाला होता.
राजकीय नेत्यांपासून गुन्हेगार वृत्तीचे लोक यामध्ये उतरले होते. बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीमुळे जिल्ह्यात अनेक गुन्हे घडले आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. आहेत, त्यामुळे शासनाने प्रथमच वाळू धोरण जाहीर केले आहे.(स्रोत:लोकमत)
गौण खनिज विभागाला कोणत्याही सूचना नाहीत
वाळू धोरण आल्यानंतर ऐनवेळी धांदल उड्डू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने वाळूशी संबंध येणाऱ्या संबंधित तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या होत्या. तहसीलदारांनी तलाठी, सर्कल व मंडल अधिकारी आदी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आदेश केव्हाही येऊ शकतो त्यानुसार कामाची तयारी ठेवण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाला अन् सर्वच प्रश्न अनुत्तरीत राहिले.
पुढील दौरा केव्हा होणार?
पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने अनेकांच्या आशेची निराशा झाली. भविष्यात पालकमंत्री केव्हा सोलापूरला येणार? वाळू धोरण कधी जाहीर करणार अन ६०० रुपयात वाळू केव्हा मिळणार यावर शहर जिल्ह्यात चर्चा घडत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज