मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
घरगुती कार्यक्रमासाठी मंगळवेढ्याकडे स्कुटीवरून निघालेल्या पती-पत्नीला लक्झरीने जोराने धडक दिल्याने स्कुटीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. यामध्ये पति मृत्युमुखी पडला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील दत्तात्रय कुंडलिक लवटे आणि लताबाई दत्तात्रेय लवटे हे पती-पत्नी मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी 7.30 वा.
आपल्या स्कुटी नं. MH 14 BG 3639 वरून मंगळवेढा येथे राहणाऱ्या पोपट लवटे या भावाच्या घरी घरगुती कार्यक्रमानिमित्त निघाले होते.
या दरम्यान नंदेश्वर मंगळवेढा रस्त्यालगत असणाऱ्या बलभीम लवटे यांच्या घराजवळ MH 02 FG 6186 या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने जोराने धडक दिल्याने स्कुटी वरील पती-पत्नी रस्त्याच्या साईड पट्टीवर पडून डोक्याला, हाताला मार लागून गंभीर जखमी झाले.
ही बातमी नातेवाईकाला समजल्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील लाईफलाईन या दवाखान्यात लवटे दाम्पत्याला उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान पती दत्तात्रय कुंडलिक लवटे यांचा 3 मे रोजी मृत्यू झाला.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज