टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील शैलेवाडी शिवारात मानवी सांगाडा सापडला असून या घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. व या घटनेचा छडा लावण्यासाठी डी.एन.ए.चाचणीकरीता त्या सांगाडयाची हाडे ताब्यात घेण्यात आली आहेत.
शैलेवाडी शिवारातील गट नं.302 हा गुंडा श्रीमंत चव्हाण यांच्या मालकीचा असून या गटामध्ये मानवी शरीराचा सांगाडा सायंकाळी 4.00 वा. सापडला होता.याची खबर विकास गुंडा चव्हाण यांनी पोलिसात दिली होती.
चमडी विरहित निव्वळ हाडाचा सांगाडा शिल्लक राहिला आहे.त्यामुळे याची ओळख पटणे अशक्य झाले असल्याने ती हाडे ताब्यात घेतली असून डी.एन.ए.चाचणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मागील दीड वर्षापुर्वी असाच एक सांगाडा यापुर्वी मिळून आला होता.यात पोलिसांना छडा लावण्यात यश आले होते.
सदर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्यासोबत डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,तपास अधिकारी सत्यजीत आवटे,सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे आदी उपस्थित होते.
दरम्यान डी.एन.ए.चाचणीचा अहवाल आल्यानंतर यामागचे गुढ उकलणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज