टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतात २० वी रँक घेऊन अनोखा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे यश पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या तर नवल ते काय शेवटी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेले यश हे आकाशाला गवसणी घालण्याचाच प्रकार आहे.
अशा यशस्वीेतांच्या गुणांचा गुणगौरव व कौतुक करणे त्यांचे अभिनंदन करणे तथा आपल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांची भेट घडवून विद्यार्थ्या मध्ये प्रतिस्पर्धा
तसेच ओढ निर्माण करणे अश्या प्रेरणादायी उपक्रमांना सतत राबविणारी प्रशाला म्हणजे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल व मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालय
आज प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आलेल्या अतिथीचा सन्मान आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंखे यांच्या यापस्थित आजचे प्रमुख पाहुणे यांचा परिचय देताना प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी सांगितले की,
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी (आयईएस) मंगळवेढा तालुक्यातील बठाण गावच्या संजय सलगर यांनी यश मिळवले.
देशात २० वी रँक मिळवली. शुक्रवारी दुपारी निकाल जाहीर झाला. सध्या एनएलसी इंडिया लिमिटेड (पीएसयू, भारत सरकार कोळसा मंत्रालय) मध्ये उप.कार्यकारी अभियंता म्हणून तामिळनाडूत कार्यरत आहेत.
यापूर्वी डीआडीओमध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले आहे. संजय यांनी गेट परीक्षेत चार वेळा उत्तीर्ण केली आहे. संजयचे आई-वडील अशिक्षित आहेत
आई-वडिलांनी अतिशय मेहनतीने घरची कुटुंबाची परिस्थिती बेताची असताना खडतर प्रवास करून संजय सलगर यास शिक्षण दिले आहे.
तर थोरला भाऊ हा भाजीपाला व्यापारी असून थोरल्या भावाच्या सहकार्यामुळे व जिद्दीने इथपर्यंतचा प्रवास केला आहे. परिस्थिती अनुकूल वा प्रतिकूल याचा कोणताही विचार न करता जो ध्येय गाठतो तोच खरा यशस्वी अशा शब्दात त्यांच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सलगर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांशी हितगुज केले व त्यांना पडलेल्या विविध प्रश्नांचा अचूक वेध घेत मुक्त संवाद साधला या वेळी त्यांचे थोरले बंधू बापू सलगर व बठानचे सरपंच शिंदे साहेब, तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी दावल इनामदार व संस्थेचे कार्यकारी संतोष कोळशे पाटील, सोमनाथ इंगळे, कृतिशील शिक्षक लक्ष्मण नागणे सर हे उपस्थित होते.
मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग भरारी
दि. 2.जानेवारी 2023 उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल व मदन सिंह मोहिते पाटील सायन्स महाविद्यालय यांच्या सुयुक्त विद्यमाने.
विज्ञान शाखेत शिकलेली विद्यार्थिनी. एम.पी.एससी च्या माध्यमातून STI उत्तीर्ण झाली. या मुळे प्रशाले कडून मनीषा कदम ( दसुर) या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तेंव्हा योग्य वेळी आलेल्या संधीचा व पालकांनी टाकलेल्या विश्वासाचं सोनं केलं पाहिजे . अभ्यासू वृत्ती बाळगावी तसेच यश संपादन करावे अशा शब्दांत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनही मनीषा कदम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनात स्पर्धा परीक्षा विषयी असलेल्या शंका -कुशंका विचारात घेऊन आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी आपल्या प्रशालेत असे गुणवंत विद्यार्थी घडोत अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी प्रशाला व महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज