टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतामध्ये लागवड केलेल्या पिक नोंदणी साठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. या वेळ काढू धोरणातून शेतकाऱ्यांची सुटका करत पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्यासाठी महसूल विभागाने शेतकन्यांना ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून दिले आहे.
घर बसल्या आपल्या मोबाईल वरून पिक नोंदणी केली करणे सहज शक्य झाले आहे. या प्रयोग यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल अॅप्लिकेशनवर नोंदणी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
आता पर्यंत 12 हजार शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंदणी केली आहे.शेतजमिनीच्या उतान्यावर नोंदणी करण्याची पिकांची नोंद करण्याच्या पारंपरिक पध्दतीमध्ये महसूल विभागाने बदल केला आहे.
पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा आता थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महसूल विभागाने टाटा ट्रस्ट, मुंबई यांचे सहकार्याने ई पीक पाहणी या स्वतंत्र अॅप्लिकेशनची नव्याने निर्मिती शासनाने या पिक नांदणी विषयाला प्रथम प्राधान्य दिले आहे.
ई . पीक पाहणी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी कामी गुगल प्ले स्टोअरवर नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ई पीक पाहणीचे मोबाईल अॅप व्हर्जन २ चा वापर दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजीपासून सुरु करण्यात आला आहे.
रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंदणी सुरू असून आजपावेतो जिल्यातील केवळ १२ हजार ५० शेतकऱ्यांनीच आपली पीक पाहणीची नोंद अॅपवर केली आहे.
या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी शेतकन्यांनी त्यांच्या मोबाईलमधील पूर्वीचे अॅप्लिकेशन डिलिट करावे. ई. पीक पाहणीचे मोबाईल अॅप वर्जन २ ची लिंक epeek.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेली असून सदरचे अॅप्लिकेशन है गुगल पे स्टोरवर https://epeek.mahabhumi.gov.in/ pun/androidapp/app-releases.apk) नोंद करावी.
शेतकरी सक्षम होण्याबरोबरच एक पारदर्शक डाटा तयार होण्यास यामुळे मदत होणार आहे. मदरचा डाटा हा कृषिविषयक अन्य योजनांसाठी वापरणे सुलभ होणार आहे.
पीक विम्याशी संबंधित दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची अचूक आकडेवारी, राज्यातील पिकांचे एकूण क्षेत्र ही माहिती मिळण्यास या अप्लिकेशनमुळे मदत होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज