टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील आठ मंडलापैकी सात मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निश्चित करण्यात आली त्यामध्ये पाटकळ मंडळ वगळण्यात आल्यामुळे तात्काळ आ. समाधान आवताडे यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे पत्र व्यवहार करून या मंडळाचा समावेश करण्याची मागणी केली होती.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे.
अशा वर नमूद दि. १० नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट “अ” येथे नमूद केलेल्या एकूण १०२१ महसुली मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत.
आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी, लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविलेली २२४ नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळांकरिता नव्याने सवलती लागू करण्यास शासनाने काल शासन निर्णयाद्वारे मंजूरी दिली.
त्यामध्ये जमीन महसूलात सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती,कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट,शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे. या सवलती या मंडळातील शेतकऱ्यांना लागू झालेल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज