टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालयामधून विद्यार्थी व इतर नागरिक यांना निरनिराळ्या शासकीय, वैद्यकीय अथवा इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना छोट्या-मोठ्या कारणांसाठी वेठीस धरू नका
अशा सक्त सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील विविध प्रशासकीय यंत्रणा व सेतू आणि महा-ई सेवा केंद्र चालकांना दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील सेतूचालक व महा-ई सेवा केंद्र चालकांची आ.आवताडे यांनी मंगळवेढा जनसंपर्क कार्यालयामध्ये बैठक घेऊन वरील सूचना दिल्या आहेत.
सदर बैठकीप्रसंगी बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या जवळपास ५५ महा ई-सेवा केंद्र कार्यरत आहेत. या महा-ई सेवा केंद्र अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप, उच्चशिक्षणासाठी प्रवेश, तसेच निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे शासकीय दाखले, उत्त्पन्न दाखले आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
विद्यार्थी व इतर नागरिक तसेच शेतकरी यांना गरजेचे असणारे दाखले देण्यासाठी कोणत्याही प्रकारची चालढकल न करता अथवा शासकीय फी पेक्षा जास्त शुल्क आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर मंगळवेढा तहसील व इतर शासकीय कार्यालयातून आवश्यक दाखले तांत्रिक त्रुटी लवकरात-लवकर बाजूला करुन आवश्यक दाखले त्वरित उपलब्ध होणेकामे कार्यान्वित करण्याचेही आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.
नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून शासनाने सुरू केलेल्या महा-ई-सेवा केंद्र म्हणजे जनतेच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दालन आहे. तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या असणाऱ्या विविध समस्या अथवा अडी-अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव शासनदरबारी आपल्यासोबत असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी नमूद केले आहे.
या बैठकीसाठी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगेरे, माजी पं.स. सदस्य संजय पवार, वरिष्ठ लिपिक विवेक ढेरे, न.पा.प्राथ.शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांचेसह तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र चालक तसेच सेतू चालक आणि इतर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज