मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आजपर्यंत जो माणूस माझ्यापर्यंत आपले काम घेऊन पोहोचला त्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढेही मी ते अविरतपणे सुरू ठेवणार आहे. संत बागडेबाबा यांच्या दारात उभे राहून भल्याभल्यांची खोटं बोलण्याची हिंमत होत नाही.
म्हणूनच मी संत बागडेबाबांच्या साक्षीने सांगतो की, तुम्ही जर मला येत्या विधानसभा निवडणुकीत संधी दिली तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
मारोळी (ता.मंगळवेढा) येथील संत बागडेबाबा आश्रमात आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी उपसरपंच रामचंद्र जाधव, आप्पासाहेब माने, गुलाब थोरबोले, बाळासाहेब शिंदे, रमेश पवार,कृष्णदेव लोंढे, चंद्रकांत देवकर, इंद्रजित पवार, तानाजी चव्हाण, नाथा काशिद, यशवंत होळकर, सुरेश कांबळे,आण्णा वाकसे,
दादा बुरूंगले यांचेसह मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारोळी येथील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांनी अभुतपूर्व गर्दी केली होती.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, महिलांसाठी आयोजित केलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम केवळ तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित केला आहे.
प्रत्यक्षात मला महिलांसाठी मोठे काम करायचे आहेत. मी सर्व स्तरातील लोकांसाठी माझ्या पद्धतीने काम केले आहे.
सिनेअभिनेत्री पूजा काळभोर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांना शैलजा अनिल सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज