मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर ते मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गलगत सोहाळे शिवारात असणाऱ्या हॉटेल शिवराज पॅलेसच्या आवारात चक्क कंटेनरमधून सिलेंडर टाक्यांमध्ये चोरून गॅस भरण्याचा जीवघेणा खेळ करून
तो काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना कामती पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींसह ६० लाख २६ हजार ३६९ रुपयांचा मुद्देमाल कामती पोलिसांनी हस्तगत केला असून स.पो.नि.राजकुमार डुणगे यांनी कामतीचा नुकताच पदभार घेतला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हॉटेल शिवराज पॅलेसच्या पाठीमागे तुकाराम नाईकनवरे (वय ३५, व्यवसाय- हॉटेल चालक, रा. सोहाळे), संजय पाटील (वय ३६, व्यवसाय ड्रायव्हर, रा.डोंगरगाव, ता.मंगळवेढा) व कंटेनर चालक असे तिघे मिळून (क्र.एम. एच.४८ एवाय ४६९८) हा
कॅप्सूल आकाराचा गॅस भरलेला कंटेनरमधून स्फोटक व ज्वलनशील गॅस कंटेनरमधून काढून गॅस टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता कंपनीच्या कोणत्याही संमती शिवाय चोरी करीत असताना मिळून आले आहेत.
या कंटेनरमध्ये डिलीव्हरी चलन पावतीप्रमाणे एकूण १७ हजार ६४० किलो वजनाचा ०८ लाख ४० हजार ३६९ रुपये किंमतीचा गॅस असून यामधून घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरून
त्या टाक्या अशोक लेलँड पिकअप (क्र.एम.एच.२५ एजे ५१८६) वाहनामध्ये भरण्यात येत होत्या. या पिकप मध्ये ५६ रिकाम्या गॅस सिलेंडर टाक्या व १८ गॅस सिलेंडर टाक्या पूर्णपणे भरलेल्या, एक इलेक्ट्रीक वजनकाटा आढळून आला आहे.
कामती पोलिसांनी छापा टाकून ६० लाख २६ हजार ३६९ रुपयांचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून याबाबत अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.
रॅकेटमध्ये आणखीन संशयित असण्याची शक्यता
गॅस कंटेनरमधून ज्वलनशील असणारा गॅस घरगुती व व्यावसायिक सिलेंडर टाक्यांमध्ये भरणे हे अत्यंत धोकादायक काम आहे. शिवाय पिकअप मध्ये सुमारे ७५ टाक्या आढळून आल्या आहेत. इतका गॅस कंटेनर मधून कमी होतो, हे वरिष्ठांना कसे काय कळत नव्हते….? त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे… ? याचा तपास करणे पोलीस यंत्रणेच्या समोर आव्हान असणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज