मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ गावच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्या पोलिस पाटलाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदात विषारी औषध टाकले.
संशयित आरोपी पोलिस पाटील तुकाराम भैरू कांबळे (रा.डिकसळ, ता.मंगळवेढा) यास मंगळवेढा पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथून अटक केली. त्यास आज बुधवारी दुपारी मंगळवेढा येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, डिकसळ गावांमध्ये दि. ३ जुलै २०२३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जवळपास पाच ते आठ हजार लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या बंदिस्त टाकीत पाणी पाइपने आत सोडण्याच्या जागेतून अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
सकाळी शाळा भरल्यानंतर चार ग्रामस्थ व तीन विद्यार्थ्यांनी हे विषारी पाणी पिल्यानंतर ही गोष्ट आली होती. तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेने गावाला माहिती दिल्यामुळे गाव सतर्क झाले होते. ग्रामसेवक राहुल कांबळे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. पोलिस तपास करीत असताना संशयित आरोपी व्यवसायाने टेलर असल्यामुळे कवठेमंकाळ येथील एका टेलरच्या दुकानात कामाला राहिला होता.
तेथून गावातील एका नागरिकाला संपर्क साधल्यानंतर फोन लोकेशनद्वारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले घेऊन अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून. गुन्हा का केला? या प्रकारचे कृत्य का केले? याचा पोलिस कसून चौकशी करीत असून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, पाण्याच्या हौदाशेजारील दगडात पाण्यात टाकलेले औषधाची बाटली सापडली. त्या आधारे पोलिसांनी तपास केला असता मरवडेतील मेडिकलमधून ते औषध खरेदी करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस पाटील कांबळे दिसत आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच ग्रामसभेचा ठराव करून जर संशयित आरोपीस अटक नाही अटक केली नाही तर १३ जुलै मरवडे येथे रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली आहे.
सोमवारी गावातील नागरिकांनी दि.१९ जुलै रोजी सह्यांचे निवेदन पोलिस स्टेशन व तहसीलदार यांना दिले. त्या निवेदनामध्ये पाण्याच्या हौदात विषारी औषध टाकल्यानंतर दि.३ जुलैपासून पोलिस पाटील तुकाराम कांबळे हा फरार आहे. त्यानंतर तपासाची चक्रे गतीने फिरली अन् अटक करण्यात आली.
शाळेतील तीन विद्यार्थी व चार ग्रामस्थांनी ते विषारी पाणी पिल्यामुळे प्रशासन व गावातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्राम सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज