टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात दामाजी रोड, नागणे सायकल मार्ट शेजारी असलेले कॅफे स्वराज्य स्पेशल चहा या जलपान गृहात आज दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत खास शिवजयंती निमित्ताने सेंद्रिय आरोग्य दायक गुळाच्या चहाचे मोफत दिला जाणार असल्याची माहिती संचालक ऋषिकेश भोसले यांनी दिली आहे.
पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील लक्झरी कॅफे कल्चर मंगळवेढा शहरात सुरू आहे. यामध्ये फॅमिली व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वराज कॅफेमध्ये अतिशय आरामदायी बैठक व्यवस्था असून,प्रत्येकाला कुटुंबिय , मित्र परिवारासमवेत स्वराज स्पेशल चहा , कॉफी , कॅड-बी , कोल्ड कॉफी , ड्रायफूट मसाला दूध , लस्सी , ग्रीन टी , मसाला ताक , थीक कोल्ड कॉफी,कोकण सरबत ,ओरिओ शेक,आईस-टी, थंडाई, कैरी पन्हे व लिंबू सरबतचा आस्वाद घेता येणार आहे.
खवय्यांना रसनातृप्तीचा आनंद देतानाच तत्पर व आपुलकीची सेवा देणारा स्टाफ , ग्राहकांच्या आवडीनुसार, त्यांच्या पसंतीस उतरणारा मेन्यू येथील वैशिष्ट्ये असल्याने एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन टीम स्वराज कॅफेकडून करण्यात आले आहे.
स्वराज्य कॅफेच्या शिवजयंती निमित्ताने सेंद्रिय आरोग्य दायक गुळाचा चहा मोफत देण्यात येणार आहे.सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन टीम स्वराज कॅफे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज