टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत हिमोग्लोबिन तपासणी व कुपोषण निदान मोफत शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
सदृढ व निरोगी बालपणाचा प्रवास येथे सुरू होतो याप्रमाणे बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल परदेशी एम.बी.बी.एस., डी.सी.एच.,डी.एन.बी.,एम.आर., सी.पी.पी.एच (इंग्लंड) के.इ.एम. मुंबई, भाभा हॉस्पिटल, मुंबई, मॅक्स हॉस्पिटल दिल्ली हे डॉक्टर तपासणी करणार आहेत.
अत्याधुनिक मशिनद्वारे रक्त न काढता हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वजन, उंची तपासणी, आहार विषयक सल्ला, औषधे व लसीकरण सल्ला देखील दिला जाणार आहे.
या शिबिरात कोणी सहभागी व्हावे; नवजात बालकांपासून ते सतरा वर्षापर्यंत
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या शिबिरात अती थकवा, भुक न लागणे, वजन कमी असणे, कमी उंची, चिडचिडेपणा, जेवण अंगी न लागणे, पोटदुखी, मतिमंद, वारंवार सर्दी, खोकला, जुलाब, जंत होणं,
अभ्यासात एकाग्रता नसणे आदी लक्षणे असणाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी. दरम्यान विशेष औषध सवलत ५ टक्के दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर आयोजित करण्यात आले अजून यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास 9021578180, 8956650654 या नंबरवर संपर्क साधावा.
महात्मा फुले जनआरोग्य अंतर्गत एक दिवस बाळापासून १७ वर्षे वयोगटा माफत उपचार, निमोनिया (फुफ्फ्स दा), डेंगू, इतर कोणत्याही आजारामुळे येणार ताप, नवजात बालकांना पेटीत ठेवण्याची माफत सोय, पिवळे व केसरी कार्ड धारकांना मोफत एडमिशन दिले जाणार आहे.
उद्या होणाऱ्या शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज