मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्येच रक्तदाब व मधुमेह तपासणी देखील होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान आरोग्य कार्ड व आधारकार्ड दुरूस्ती अभियान संपन्न होणार आहे.
रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी भाळवणी पासून या शिबिराची सुरुवात होईल. पुढील नऊ दिवस हे शिबीर सुरू असल्याची माहिती भाजपा युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यासाठी एच व्ही देसाई हॉस्पिटल हडपसर यांचे देखील सहकार्य लाभत आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेन्ससहीत व मोफत चष्म्यासह सुविधा दिल्या जाणार आहेत.
यामध्ये रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी, २८ ऑगस्ट रोजी तुंगत, २९ ऑगस्ट रोपळे, ३० गादेगाव, ३१ ऑगस्ट रोजी खर्डी,
१ सप्टेंबर रोजी कासेगाव, २ सप्टेंबर रोजी पुळुज, ३ सप्टेंबर रोजी उंबरे – पागे तर ४ सप्टेंबर रोजी ग्रामीण रूग्णालय करकंब याठिकाणी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार असल्याचे प्रणव परिचारक यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज