टीम मंगळवेढा टाईम्स ।
वेळोवेळी सूचना देऊनही पंधराव्या वित्त आयोगातील निधी विकास कामावर खर्च न करता गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवणाऱ्या जिल्ह्यातील चौदा ग्रामपंचायतीवर
कठोर कारवाई करण्याचे नियोजन जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून आखण्यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
मागील दोन वर्षापासून पंधराव्या वित्त आयोगातील विकास निधीपैकी एक रुपयाही निधी न खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये
बार्शी तालुक्यातील दोन , करमाळा तालुक्यातील चार माढा तालुक्यातील चार , माळशिरस तालुक्यातील दोन , मोहोळ , सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एक अशा चौदा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातील एक रुपयाही खर्च केला नव्हता.
या संदर्भात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने कठोर कारवाईची भूमिका घेत संबंधित ग्रामपंचायतींना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.
त्यानंतर २८ पैकी १४ ग्रामपंचायतींनी निधी खर्चास गती दिली. मात्र १४ ग्रामपंचायतीने अद्याप विकास कामावर एक रुपयाही खर्च केला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे.
निधी न खर्च करणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
बार्शी- चिंचोली ढेरेवाडी , पिंपळगाव पान . करमाळा मळवडी , वडशिंगे , वीट , पोंधवडी . – माढा- चांदज , लऊळ , परिते , तडवळे . माळशिरस- आनंद नगर , बांगडे . मोहोळ- आष्टे , सांगोला- आगलावेवाडी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज