टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपरिषद हद्दीतील गावठाण भागामध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई काढण्याच्या मागणीसाठी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा माळी गल्लीतील रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सांगोला नाका येथून काही अंतरावर असणाऱ्या एका महाविद्यालयासमोर एक इसम गेली १ वर्षापासून टप्याटप्याने अतिक्रमण करत असून, आतापर्यंत त्याठिकाणी तीन गाळ्याचे पत्राशेड बनवले आहे.
जवळपास १ एकर परिसराला तारेचे कंपाउंड केले असून माझीच जागा असल्याच्या अविर्भावात तो सध्या वावरत आहे. सदर जागा ही गावठाण हददीतील असल्याचे मुख्याधिकारी यांनी मान्यही केले होते.
त्यानुसार दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी नगरपालिकेच्या वतीने सदर अतिक्रमणधारकास ५ दिवसाचे आत अतिक्रमण काढण्याची नोटीस देखील बजावली होती. परंतु अजूनही त्यावर कारवाई झालेली नाही.
सदर घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी न.पा. कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
गावठाण जागेतील अतिक्रमणे काढणार
सदर अतिक्रमण केलेल्या सर्व गावठाण जागेतील अतिक्रमण काढले जाणार असून पोलीस ठाण्याकडे रितसर पोलीस बंदोबस्त मागितला आहे.
येत्या २-३ दिवसात पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर अतिक्रमण काढले जाणार आहे.- चरण कोल्हे, मुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपरिषद.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज