मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठलाच्या आज होणाऱ्या शासकीय पूजेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,
आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खनिज मंत्री दादा भुसे, कामगारमंत्री सुरेश खाडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार व वरिष्ठ शासकीय अधिकारी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत.
राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री, मंत्री व वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांची व्यवस्था करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शमा पवार यांनी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
आषाढी वारीनिमित्त पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव हे पंढरपुरात आहेत. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहातील व्यवस्थेची जबाबदारी पंढरपूरचे तहसीलदार सुशील वेल्हेकर, निवासी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यावर सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आल्यानंतर त्यांची जबाबदारी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडे देण्यात आले आहे. तर ना. शिंदे यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
संपर्क अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जात पडताळणी समिती विभागाच्या छाया गाडेकर, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,
जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर पी. के. वाघमोडे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांच्यावर संपर्क अधिकारी म्हणून मंत्र्यांच्या नियोजनाची जबाबदारी ठेवण्यात
सोपविण्यात आली आहे. तर उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, सहसंचालक उच्च शिक्षण अशोक उबाळे यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यास नियोजनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
निवेदने स्वीकारून कार्यवाहीची जबाबदारी लांडगे यांच्याकडे
आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर येथून पंढरपूर कडे रवाना होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना प्राप्त होणारी मागणी निवेदने स्वीकारून कार्यवाही कामी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.(स्रोत;पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज