टीम मंगळवेढा टाईम्स।
जानेवारी ते डिसेंबर २०२४ पूर्वी जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबरअखेर निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित असून, सध्या या गावात प्रारूप प्रभागरचनेचे काम पूर्ण झाले आहे.
निवडणूक आयोगाने या ५० ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. आज शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला असून संबंधित ग्रामपंचायतीला शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
शुक्रवारी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.
त्यानंतर १२ फेब्रुवारीपासून अधिसूचनेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मान्यता देणार आहेत. १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
२१ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी हरकती विचारात घेऊन अभिप्राय सादर करणार आहेत. २३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचे
अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मान्यता देणार आहेत. २३ फेब्रुवारी रोजी अंतिम आरक्षण व अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
अंतिम मतदार यादी कार्यक्रम
१४ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. १४ ते २० फेब्रुवारी दरम्यान संबंधित गावकऱ्यांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. २३ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.(स्रोत:लोकमत)
या गावांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका
मंगळवेढा : कागष्ट, माळेवाडी, खवे, जित्ती, शिवणगी, येळगी, हुन्नर, बार्शी : सुर्डी, लाडोळे, रुई, ताडसोंदणे, दहिटणे, दक्षिण सोलापूर : कुडल, आलेगाव. अक्कलकोट : सातनदुधनी, संगोगी ब., समर्थनगर, कल्लप्पावाडी, गांधीनगर सोळसे लमाण तांडा. माढा वेणेगाव, उजनी टें. करमाळा: वरकुटे, भाळवणी, लव्हे.
पंढरपूर: बिटरगाव, जळोली, जाधववाडी, पांढरेवाडी, गाडी, लोणारवाडी. मोहोळ : कोन्हेरी, लमाणतांडा, वड्डेगाव, गोटेवाडी. सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, गळवेवाडी, सोनंद, माळशिरस: खुडूस, हनुमानवाडी, जाधववाडी, अंजेवाडी, सुळेवाडी, डोंबाळवाडी, पिलीव, भांबुर्डी, डोंबाळवाडी कु., झिजेवस्ती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज