टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्नात मानपान केला नाही, तुला फुकट करून घेतले आहे, तु अपशकुनी असल्याने सासरे मयत झाले तसेच मोटर सायकल व सोने घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्यासाठी शारिरिक व मानसिक त्रास देवून २८ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नवऱ्यासह पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी रुपा खडगे हिचा विवाह मरवडे येथील सागर विठ्ठल खडगे याच्याशी १६ एप्रिल २०१६ रोजी झाला आहे.
यातील आरोपी नवरा सागर, सासू सुगलाबाई खडगे, जाऊ आरती खडगे, दीर नितीन खडगे, सचिन खडगे या पाच जणांनी फिर्यादीस तुझे माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तुला फुकट करून घेतले आहे,
तु अपशकुनी असून घरात आल्यानंतर सासरे विठ्ठल मयत झाले असे म्हणून तसेच दोन तोळे सोने व मोटर सायकलसाठी माहेरून ५० हजार रुपये घेवून ये.
या कारणासाठी शिवीगाळी व दमदाटी करून दि १६ एप्रिल २०१६ ते २ ९ जानेवारी २०२१ या दरम्यानच्या कालावधीत शारिरिक, मानसिक त्रास दिला असून पती सागर याने दुसरे लग्न केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज