मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । गॅसगळती होऊन अचानक लागलेल्या आगीत दोन मुले भाजून मृत्युमुखी पडली, तर आई गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाली आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता (ता. 2) तरंगफळ (ता. माळशिरस) येथे घडली आहे.
सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय 7) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय 5) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, सोनाली ज्ञानेश्वर शिंदे (वय 30) असे जखमी होऊन मयत झालेल्या आईचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सोनली शिंदे या सकाळी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसगळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला. त्या वेळी त्या घराबाहेर होत्या, तर लहान मुले झोपेत होती. त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी घरात गेल्या, त्या वेळी आगीचा भडका वाढतच होता.
दरवाजातून बाहेर निघू शकत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने घराची मागील भिंत पाडून आई व मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र तिघेही जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत होते. त्यांना त्वरित अकलूज येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. शासकीय हॉस्पिटलमध्ये सावळा शिंदे याचा मृत्यू झाला. नंतर आई सोनाली व मुलगा कृष्णा या दोघांना सोलापूर येथील शासकीय हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना कृष्णा याचा मृत्यू झाला. आई गंभीर अवस्थेत असताना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्याही उपचारादरम्यान मयत झाल्या आहेत.
या घटनेचा पंचनामा केला असून, घरातील तीन लाख रुपये रोख जळून खाक झाले आहेत, तर शेजारच्या घराचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
A fire caused by a gas leak killed two children, including a mother Tarangphal Malshiras
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज