टीम मंगळवेढा टाईम्स ।
भैरवनाथ शुगर लवंगी येथील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या कामगाराच्या कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात व तसेच मदत करण्यात एक पाऊल पुढे असलेले अनिल सावंत यांचे या मदतीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भैरवनाथ शुगर लवंगी यु नं 3 मधील कामगार दिंगबर जयराम बनसोडे यांचा काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यामुळे बनसोडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बनसोडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत भैरवनाथ शुगरचे फाईल चेअरमन अनिल सावंत यांनी बनसोडे कुटुंबीयांना 75 हजार रुपयांची मदत केली.
75 हजार रुपयांचा धनादेश अनिल सावंत यांच्या हस्ते मृत कामगार बनसोडे यांचे वडील जय राम बनसोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
यावेळी जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, शेती अधिकारी कृष्णकांत लोंढे, चीफ अकाउंटंट देवानंद पासले, एच आर मॅनेजर संजय राठोड उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज