टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करणे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरण करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरण करणे कामास जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली.
गेल्या एक वर्षापासून सर्व कामाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडे निधी मंजूरी साठी पाठविले होते परंतु काही जणांच्या अडवणुकिमुळे प्रलंबित होते,
परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मंगळवेढा तालुक्यातील शिष्टमंडळाने भेटून ही गोष्ट सांगितल्यानंतर दादा नी तात्काळ जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी वरून आदेश देवून नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यास सांगितले
व त्यानुसार जिल्हाधिकारी यांचेसमवेत दि.३ फेब्रुवारी रोजी सोलापूर कार्यालयात बैठक घेऊन सर्व महापुरुषाचे परिसर सुशोभीकरण विकसित करणे कामासाठी निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदर प्रस्तावास प्रशासकिय मंजुरी व निधी वितरीत केला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द अखेर खरा केल्यामुळे मंगळवेढा शहर व तालुक्यतून सर्व समाजबांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज