मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची खोटी आकडेवारी एका युट्युब चॅनलने प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्या युट्युब चॅनलच्या संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषित केलेला आहे.भारत सरकार आरोग्य मंत्रालय , महाराष्ट्र सरकार आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णाचे संपर्कात लोकांनी येऊ नये तसेच सार्वजनिक तसेच खाजगी जागेत २ किंवा २ पेक्षा अधिक लोकांनी जमु नये,थांबु नये,चर्चा करु नये तसेच काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता.
सर्व सामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक असल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी उपाय योजना म्हणुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १८७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) व भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अन्वये मनाई आदेश जारी केलेला असताना जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी सोलापूर शहरातील १४ कोरोना गस्त रुग्णांची माहिती प्रसिध्द करण्यापूर्वी एका युट्यूब चॅनेलने सोलापूरात आज आणखीन २२ रुग्ण एकुण संख्या २०४ वर पोहोचली अशी खोटी बातमी प्रसिध्द करुन कोरोना या साथीच्या आजाराबाबत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले म्हणून संबंधीतांवर भा.दं.वि.कलम १८८,५०५ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे , बापू बांगर पोलीस उपआयुक्त , ( गुन्हे / विशा ), अभय डोंगरे साहेब सहा.पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस निरीक्षक संजय जगताप,गुन्हे शाखा सोलापूर शहर गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/औदंबर आटोळे,पोकॉ/संजय साळुखे, पोना / श्रीशैल कुडले,पोकॉ/ सिध्दाराम देशमुख यांनी केलेली आहे.
दरम्यान अनेक नागरिक सत्यता न बघता सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांची माहीती व्हायरल करत आहेत.जिल्हाधिकारी यांनी अधिकृत माहिती दिल्यानंतरच खरी माहिती समजते पण त्याआधीच काही नागरिक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते त्यामुळे सत्यता न बघता कोणीही कोरोनाबाबत माहिती कुणाला पाठवू नये अन्यथा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
———————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज