mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रीक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकीटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.(Fertilizers and seeds delivered directly to the dam of six and a half lakh farmers in the state: Agriculture Minister Dadaji Bhuse)

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषिमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

कालपर्यंत राज्यभरात पुरविण्यात आलेल्या कृषि निविष्ठांची माहिती अशी: ठाणे विभागात ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात २७६६ गटांनी ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. पुणे विभागात १८ हजार १८१ गटांनी १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रीक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणे पुरविले आहे. औरंगाबाद विभागात ३७१६ गटांनी ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रीक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणे पुरविले आहे. लातूर विभागात ७९४९ गटांनी ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रीक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणे पुरविले आहे. अमरावती  विभागात ६२२१ गटांनी ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रीक टन खत तर ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणे पुरविले असून नागपूर विभागात २६८६ गटांनी ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रीक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे.

राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची मोहिम सुरू असून जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मुंबईत मान्सूनची कोणत्याही क्षणी धडक

मुंबईत मान्सूनची कोणत्याही क्षणी धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा