mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! विजेच्या धोक्याची माहिती द्या आता व्हॉटस्‌ऍपद्वारे, सोलापूर जिल्ह्यासाठी ‘हा’ आहे नंबर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 14, 2021
in सोलापूर
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईल व्हॉट्‌सऍपद्वारे देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉट्‌सऍपद्वारे एकूण 39 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वच तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले आहे.दरम्यान, ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने सध्या ऊस तोडणीचे काम वेगाने सुरू आहे.

अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीज तारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी उसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी वीजयंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉट्‌सऍपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455 हा व्हॉट्‌सऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती/तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.

या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्‌सऍपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्‌सऍप नाहीत त्यांनी एसएमएसद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोल किंवा जमिनीवर लोंबळकत आहे.

फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे, रोहित्रांचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरूपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्‌सऍपच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरू असलेली ही सेवा उपलब्ध आहे.

व्हॉट्‌सऍपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना व्हॉट्‌सऍपवरच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे.

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे.

महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद देण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: व्हाट्सअप्प

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढ्याला हादरवणारी बातमी! एका सुखी संसाराचा असा का झाला शेवट? २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
Next Post
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

सोलापूर जिल्हात राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढ्याला हादरवणारी बातमी! एका सुखी संसाराचा असा का झाला शेवट? २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..