टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या तिन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून
या हंगामात पहिल्या १० दिवसाच्या मस्टरमधील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन २५०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्यात आला आहे.
२५०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर पासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला होता. यानुसार गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता म्हणून २५०० रुपये प्रतिटन याप्रमाणे धनश्री बँकेत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
चालू वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून दररोज साधारणपणे ३५०० मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरु असून चालू गळीत हंगामात ४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे.
ठरविलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस सीताराम महाराज साखर कारखान्याला गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तथा धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज