मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची सुरू चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढला जातोय. राज्य विधीमंडळाचं नुकतंच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
कर्जमाफी कधी करणार? असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारने दिली होती.
ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सरकारने म्हटलं होतं. यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.
सरसकट कर्जमाफी होणार नाही. फक्त गरजूंसाठी होईल
सरसकट कर्जमाफी होणार नाही. फक्त गरजूंसाठी होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार, राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निकष नेमके काय असतील? ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात घोषणा केली की, महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. म्हणून ती कर्जमाफी कशी असावी? एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो, फार्म हाऊस बांधतो, तो कर्ज उचलतो. त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही. ज्याने कर्ज उचललं आहे, जो आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे, अशा व्यक्तीगत सर्वेक्षण करुन कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज