मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । कोराना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक शुगर या खाजगी साखर कारखान्याने बाजारात झालेला तुटवडा कमी करण्यासाठी तयार केलेल्या सॅनीटायझर त्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्पादनातील पहिले सॅनेटाईझर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तालुक्यातील महसूल व पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यासाठी पहिले उत्पादन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.कोरोना साथीचा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्यापासून सॅनेटायझर ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली परंतु मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा बाजारात उपलब्ध नसल्यामुळे त्याची विक्री चढ्या दराने होऊ लागली.
त्यामुळेच जनतेची होत असलेली ससेहोलपट कमी करण्यासाठी तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक शुगर या कारखान्याने उपलब्ध असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पातील अल्कोहल उपयोग समाजातील नागरिकांची सामाजिक गरज लक्षात घेऊन कारखान्याने सॅनेटायझर निर्माण करण्याचा निर्णय घेतला .आणि कमी कालावधीत हे बाजारात उपलब्ध करून दिले.शंभर मि.ली पासून पाच लिटर पर्यंत सॅनेटायझर उपलब्ध असून त्यामुळे कमी काळात हे प्रत्येक केल्यामुळे बाजारात झालेला तुटवडा भरून निघणार असून ग्राहकांना मागणीप्रमाणे हे उपलब्ध असून ज्या व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मागणीप्रमाणे हवे त्या प्रमाणात खरेदीसाठी कारखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष सरोझ काझी यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, तुकाराम महाराज,कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, अध्यक्ष सरोज काझी,आवताडे शुगरचे अध्यक्ष संजय आवताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने, पप्पू काकेकर ,कार्यकारी संचालक मोहन पिसे,डिसलरी मॅनेजर चेतन काळे,वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, परचेश मॅनेजर सचिन कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर कृष्णा शेळके, असि.एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज