टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना कालावधीमुळे झालेल्या कालापव्ययामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली होती.
शासनाने याची दाखल घेत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांनी दिली.
ही मागणी १० मे रोजी ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत सदस्यांना पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
यामुळे राज्यातील हजारो नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे, सरपंचांचे पद शाबूत राहिले आहे.
राज्यातील हजारो सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मागील वर्षी राज्यातील ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास फेब्रुवारी २०२२ अखेर मुदत देण्यात आली होती.
तद्नंतर उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बहुतांश कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले. काही काळ कार्यालयाचे काम थांबले होते.
काही काळ कार्यालयातील कर्मचारी संख्याही नियंत्रित करण्यात आली होती. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील कामकाजही थांबले होते.
जात प्रमाणपत्र त्यामुळे पडताळणीसाठीची सर्व प्रक्रिया करूनही अद्यापही काही सदस्यांना प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.
ही बाब सरपंच परिषदेचे पदाधिकारी आंधळकर व पंडित मिरगणे यांनी अॅड . विकास जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.
सरपंच परिषदेच्या वतीने ३० मार्च रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज