टीम मंगळवेढा टाईम्स ।
धुतलेली ओली कपडे घरासमोरील तारेवर वाळत घालीत असताना अचानक इलेक्ट्रिक धक्का बसून ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देवकतेवाडी (ता सांगोला) येथे घडली.
सुरेखा माणिक साळुंखे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत सागर हरी मोलाने यांनी खबर दिली असून , पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
देवकतेवाडी ( ता . सांगोला ) येथील सागर हरी मोलाने हे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास माणिक गणपत साळुंखे यांच्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरेखा साळुंखे व माणिक साळुंखे असे दोघे मिळून शेतातून त्यांच्या घरी आले. तेव्हा सुरेखा माणिक साळुंखे या घरासमोरील तारेवर धुतलेली ओली कपडे वाळायला टाकत होत्या.
तेव्हा त्यांना इलेक्ट्रिक धक्का लागून त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या. तेव्हा तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.उत्तम फुले यांनी तपासून ती उपचारांपूर्वी मृत झाल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज