मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा ते सोलापूर या महामार्गावर हॉटेल सुगरण च्या जवळ इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाच्या झोपेच्या भरात दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
घटनास्थळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरिगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, तहसीलदार मदन जाधव व इतर स्टाफ, क्रेन ऑपरेटर रेवणसिद्ध लवटे, लक्ष्मण लवटे, नागेश वाघमोडे, NHAI CRO मदन शिरसागर, ASST मॅनेजर अनुराग समर्थ व स्टॉप ,
फायर ब्रिगेड संभाजी कारले अग्निशमन अधिकारी पंढरपूर व STAFF, पंढरपूर नगरपरिषद फायर ब्रिगेड स्टाफ , मंगळवेढा नगरपरिषद फायर ब्रिगेड वाहन व स्टाफ, सोलापूर मनपा फायर ब्रिगेड अधिकारी रावसाहेब सलगर व स्टाफ आदीजन उपस्थित होते.
अपघातस्थळी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केली असून सकाळी 7.30 वा दरम्यान टँकर AP-31VC 8227 क्रमांकाचा टँकर इथाईल ऍसिटेट हे रसायन आंध्र प्रदेशात जात होता.
टँकर चालकाला झोप लागल्यामुळे झोपेच्या भरात सदरचा रासायन वाहून करणारा टँकर डिव्हायडरला धडकला. टँकर मधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
मात्र पर्यायी मार्ग लांबच असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली घटनास्थळी पंढरपूर मंगळवेढा सोलापूर या ठिकाणची अग्निशामक यंत्रणा प्रचारण करण्यात आली.
पलटी झालेल्या टँकर अद्याप उचलण्यात आला नसल्यामुळे वाहनाची गर्दी लक्षात घेता सध्या वाहतूक एकरी ठेवली टँकर उचलण्याच्या दरम्यान ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
सध्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या महामार्गावर ठाण मांडून आहे.
राष्ट्रीय महामार्गावर टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून सदर रसायन ज्वलनशील आहे यापासून दूर व्हावे व पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग ,पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
स्फोटक रसायनाचा टँकर पलटी
स्फोटक रसायनाचा टँकर पलटी झाल्यामुळे वाहनाने पर्यायी मार्गाने वळविली. रसायन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असून टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनधारकाने पर्याय मार्गाचा अवलंब करावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या पाहणी नंतर रस्ता खुला करण्यात आला.-दत्तात्रय बोरीगीड्डे, पोलीस निरीक्षक
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज