mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! वकील गुणरत्न सदावर्तेंंची राजकारणात एन्ट्री; केली ‘ही’ मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2022
in राज्य
Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

टीम मंगळवेढा टाईम्स। 

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात एन्ट्री केलीय. सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली.

सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत.

नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुणरत्न सदावर्ते जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा उभारणार की आणखी दुसऱ्या पर्यायाचा वापर करणार याची उत्सुकता होती.

आज त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केल्यामुळे याचं उत्तर मिळालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना भडकवल्याच्या आरोपाखाली सदावर्ते यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.

त्यानंतर राज्यभरातील विविध प्रकरणांमध्ये सदावर्ते काही दिवस जेलमध्ये होते. गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिलला जेलमधून बाहेर आले.

त्यानंतर ते पुन्हा जोशाने सरकारविरोधात भूमिका घेणार हे त्यांच्या वागण्यावरुन स्पष्ट झालं होतं.

मात्र, ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की आपली नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हतं. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदाववर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे.

एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे.

मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील अशी शक्यता वर्तवली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्यानंतर कायम आपल्या निशाण्यावर शरद पवार यांनाच ठेवलं होतं.

शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला होता.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अँड.गुणरत्न सदावर्ते

संबंधित बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
Next Post
राज्याभिषेकासाठी १ लाख ५१ हजार दिला मदतीचा हात, अभिजीत पाटलांच्या रूपाने जिल्ह्याला मोठ्या मनाचा नेता मिळाला; छत्रपती संभाजी महाराजांचे गौरवोद्गार

राज्याभिषेकासाठी १ लाख ५१ हजार दिला मदतीचा हात, अभिजीत पाटलांच्या रूपाने जिल्ह्याला मोठ्या मनाचा नेता मिळाला; छत्रपती संभाजी महाराजांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा