टीम मंगळवेढा टाइम्स ।
मुलांच्या प्रगतीसाठी सेमी इंग्रजी शाळाच योग्य असल्याचा दावा करीत खासगी शाळांनी जिल्हा परिषद शाळांतील मुले खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील काही वर्षांत खासगी शाळांमधील पटसंख्या वाढली.
खासगी शाळांप्रमाणेच सोयीसुविधांसोबत आता सेमी इंग्रजी माध्यमासाठी तयार केलेला अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शिकणार आहेत. जिल्हा परिषदेने १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते.
सद्यःस्थितीमध्ये इयत्ता पहिलीची ७० नोंदणी झालेली आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली.
यावेळी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृतरसोई योजनेची जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे आदी निर्णयही घेण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
माढ्याची शाळा दुरुस्त होणार
जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात माढा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेतील वर्गखोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामधील विद्यार्थिनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आली.
१६५ शाळांमधील ३३७८ विद्यार्थ्यांना होणार फायदा
जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इयत्ता पहिलीमधील ३३७८ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज