मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
स्मार्ट मीटरबाबत जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन उभारले असतानाच बुधगाव येथील ग्राहकाला सरासरी येणारे १३०० रुपयांचे वीजबिल स्मार्ट मीटर बसविल्यानंतर
थेट ४ हजार रुपये आले आहे. याबाबत सांगलीच्या सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त केला.
निवेदनाद्वारे संघटनांनी नागरिकांना स्मार्ट मीटर न बसविण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरला सुरुवातीपासून सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून विरोध केलेला होता.
तरीसुद्धा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महावितरण कंपनीने खासगीकरणाच्या माध्यमातून ग्राहकांना फसवून स्मार्ट मीटर काही ठिकाणी बसवलेले आहेत.
ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्यांना आता बिले जनरेट होत आहेत.
बुधगाव मधील ग्राहकाचे मार्च व एप्रिल महिन्यातील बिल अनुक्रमे १ हजार १३० व १ हजार ३० अशा पद्धतीने आले होते. त्यावेळी जुने मीटर होते. मात्र, मे महिन्यातील बिल ४ हजारच्या घरात गेले आहे. बिल स्मार्ट मीटरनुसार आले आहे.
महावितरणकडे विरोध करून सदर मीटर काढून टाकण्यासाठी अर्ज करा
ज्या नागरिकांनी असे मीटर बसवलेले आहेत त्यांनी तत्काळ महावितरणकडे विरोध करून सदर मीटर काढून टाकण्यासाठी अर्ज करावा. मीटर कोणते बसवावे, हा ग्राहकांचा अधिकार आहे.- सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज