mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीसंदर्भातील मोठी अपडेट; निवडणुका होणार ‘या’ नंतर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 25, 2022
in राष्ट्रीय
ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

टीम मंगळवेढा टाइम्स ।

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचे निवडणुकांच्या तारखा, प्रभाग रचना अधिकार राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडून काढून स्वतःकडे घेतले होते.

त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याबाबतची सुनावणी आज पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून येत्या ४ मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

त्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्य सरकारच्या वतीने म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून घेण्यात आल्याचे याचिकाकर्ते विकास गवळी यांनी या संदर्भात माहिती दिली.

ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. त्यासाठी विधानसभेत ११ मार्च २०२२ रोजी कायदा करण्यात आलेला आहे.

त्यामध्ये निवडणुकांच्या तारखा ठरवणे, प्रभाग रचना करण्याचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. त्याला एकूण १३ याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या सर्व याचिकांवर आज (ता. २५ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

मात्र, ते पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावर आता येत्या ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.राज्यघटनेप्रमाणे विहित मुदतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे, राज्य निवडणूक आयोगास बंधनकारक आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. राज्य सरकारने आता प्रभाग रचना केल्याशिवाय निवडणूक आयोग निवडणुकीची प्रक्रिया सुरू करू शकत नाही. त्यामुळे आज राज्यात दोन हजारपेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेले कायदे असंवैधानिक व बेकायदेशीर आहेत, त्यामुळे ते कायदे रद्दबातल ठरवावेत, सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे त्वरित निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात यावे, अशी विनंती या याचिकांमध्ये करण्यात आली होती.

या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात ४ मे रोजी होणार आहे, त्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आदींच्या निवडणुकीचे भवितव्य ४ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

राज्यातील सुमारे १८ महापालिकांवर सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार निर्णय येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

आता ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तरी उन्हाळ्याच्या उर्वरीत दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविणे अशक्य होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.(स्रोत:सरकारनामा)

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणुका

संबंधित बातम्या

पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

KGF फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन; चित्रपट सृष्टीत शोककळा

May 8, 2022
नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

नागरिकांनो! शिवपुत्र संभाजी महानाट्य आजपासून पंढरपुरात, विनामूल्य प्रवेश; डिव्हिपी उद्योग समुहाचा पुढाकार

May 12, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ महिन्यात सोलापुरला येणार? नियोजनासाठी २७ तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्स

April 20, 2022
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

महाराष्ट्रात लोडशेडींग; ‘या’ राज्यात 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

April 16, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

March 29, 2022
पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

Breaking! पेट्रोल-डिझेल साडेचार महिन्यानंतर महागलं; आजचे दर तपासा पटापट…

March 22, 2022
तिसर्‍या लाटेत ‘इतक्या’ लाख लोकांना संसर्गाची शक्यता; राज्यात लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता?

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? ठाकरे सरकारने जारी केला ‘हा’ अलर्ट

March 19, 2022
धोका वाढला! राज्यात उष्णतेची लाट येणार?, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

धोका वाढला! राज्यात उष्णतेची लाट येणार?, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

March 20, 2022
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

धक्कादायक! मंगळवेढ्यात वीज पडून दोन म्हशी, एका रेडीचा मृत्यू

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा