टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवकाळीपावसामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मुद्यावरुन सभागृह तहकूबही करण्यात आलेलं होतं.
सरकारच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरुही आहेत.
मात्र, अशातच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार आणि इतर यंत्रणावरती आहे. अशातच 36 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत.
अचानक बदल्या केल्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय. दरम्यान, कालच विधनसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 9 मार्च विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला.
यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावरुन देखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच कांदा प्रश्न आणि अवकाळी पाऊस या दोन्ही मुद्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळं राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली.
अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज