मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात चालू पावसाळी हंगामातील तीन महिने संपले तरीही पावसाने दडी मारली आहे. एकाही नक्षत्र काळात मोठा पाऊस पडला नाही. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत,
बागायती क्षेत्र होरपळत आहे.अश्या परिस्थितीत शेती व शेतीवर आधारित उद्योग धंद्यावर चालणारा गावगाडा ठप्प झाला आहे. त्यामुळे श्रावणाचे औचित्य साधून गाव गावातील ग्रामदैवतांना ग्रामस्थांनी जलाभिषेक केला. पाऊस पडावा व ठप्प झालेले शेतीचक्र नव्या जोमाने सुरू व्हावे असे साकडे घालण्यात आले.
ग्रामदैवतांना जलाभिषेक केल्यावर पाऊस पडतो व दुष्काळ हटतो अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्या ज्यावर्षी दुष्काळ पडतो. त्यावर्षी श्रावण सोमवारी गावातील सर्व मंदिरातील देवी देवतांना ग्रामस्थां मार्फत मोठ्या भक्तिभावाने व जलाभिषेक केला जातो.
खांद्यावर घागर घेऊन सर्व देवांना स्नान घातले जाते. त्यांची विधिवत पूजा केली जाते. यामध्ये सलगर बुद्रुक येथील नंदी बसवेश्वर भक्त स्वामींच्या हस्ते मंत्रोच्चार करून जलाभिषेक केला जातो.
दरम्यान पाऊस पडत नसल्याने राज्यभर दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या मंगळवेढा तालुक्यात खूप गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठीही विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. बागायत क्षेत्र होरपळत आहे.
शेती व त्यावरील आधारित जोडधंदे उदाहरणार्थ दूध व्यवसाय गोपालन, शेळीपालन कुक्कुटपालन अशा सर्वच शेती व्यवसायावर खूप वाईट वेळ आली आहे.
पावसाअभावी या परिसरातील शेतकरी हवालदिन झाला आहे. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान प्रशासन ही सुन्न आहे दुष्काळी उपाय योजनेची कोणतीही पावले उचलली जात नाहीत.
त्यामुळे निसर्गाच्या व प्रशासनाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्का जाहीर करून शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीच्या उपाय योजना कराव्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.(स्रोत : सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज