mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दीपावलीचा पहिला सण वसुबारस ‘या’ दिवशी कशी करावी गोमातेची पूजा.? जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 12, 2020
in आरोग्य
दीपावलीचा पहिला सण वसुबारस ‘या’ दिवशी कशी करावी गोमातेची पूजा.? जाणून घ्या

दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे, म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पणत्या लावतात. अंगणात रांगोळ्या काढतात कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात.

कोणी फुलांची, तर कोणी धान्याची रांगोळी काढतात रांगोळ्यांमुळे अंगी असलेली कला दाखवण्यास वाव मिळतो प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळ्या आकारातील आकाशकंदील लावलेले असतात सुबक रांगोळ्या, टांगलेले आकाशकंदील, तेवणाऱ्या पणत्या आणि फटाक्यांची, रोषणाई यामुळे सगळे वातावरण उत्साही आणि आनंदी होते.

लहान मुले मातीचे किल्ले बांधतात. वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.

गायी- गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हिंदुस्थानी संस्कृतीत गोमातेला फार महत्त्व आहे. ‘वसुबारस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दिवाळीच्या या पहिल्या दिवसाचे नाव संस्कृतमध्ये गोवत्स द्वादशी असं आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त सहा ते सव्वासहाच्या दरम्यान असल्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या थोडेसे आधीच साडेपाच पावणेसहापूर्वीच सर्व गोशाळा (गोठे) स्वच्छ करून रांगोळ्या, तोरणे यांनी सजवून, पणत्या, दीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तीने गायवासरू पूजन करायचे आहे.

यावेळी ताम्रकलश (तांब्याचा लोटा, ताम्रपत्र, तांब्याच फुलपात्र, पंचपात्री, पेला) पाण्याने भरून घेऊन गायवासरांच्या पायावर (डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून) पाणी सोडावे यालाच म्हणतात अर्घ्य.

हे अर्घ्य देताना म्हणवायचा मंत्र असा –
क्षीरोदार्णव- संभूते सुरसुर- नमस्कृते ।
सर्व-देव मये मातर गृहाण अर्घ्य नमोस्तुते! अर्थ – क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा ( कामधेनू )माते, मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर तुला आमचे अनंत प्रणाम !

ज्या गायवासरांचे पूजन करायचे ती शक्य तर एका वर्णाची असावीत गाय भरपुर दूध देणारी असावी. तिची गंध, कुंकूम, अक्षता वाहून, पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर तिला उडीद वडे (कानडी भाषेतील मेदूवडा) खायला घालावेत. या वेळी गोमातेची प्रार्थना करावी.

सर्व-देव-मये देवि । सर्व-देवैर अलंकृते ।
मातर मम अभिषितं सफलं कुरु नन्दिनी ।।

अर्थ – सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते! सर्वदेव तुझ्या ठायी निवास करतात. म्हणून तू सर्वदेवमयी सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे. तेव्हा हे आई आमच्या ईच्छा पूर्ण कर.

या दिवशी आपण गायीचे दूध, दही, तूप, ताक; तसेच तेलात तळलेले वडे इ. पदार्थ वर्ज्य करावेत. याच गोवत्स द्वादशी- वसुबारसेपासून पाच दिवस (पाडव्यापर्यंत) देव, विद्वान, गुरुजन, गायी, घोडे, वडीलधारी मंडळी, मुलेबाळे या सर्वांचे घरातील माताभगिनींनी नीरांजनाने ओवाळून औक्षण दीर्घायुष्यचिंतन करावे असे नारदवचन आहे.

दिन-दिन दिवाळी । गाईम्हशी ओवाळी ।
गाई म्हशी कोणाच्या । गाई म्हशी लक्ष्मणाच्या।।

याच वेळी बाळगोपाल आनंदित होऊन फुलबाज्या गोल गोल फिरवून गाणे म्हणत असतात. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदील लावतात. स्त्रिया अंगणातील तुळशीवृंदावनापुढे पणती लावतात. सर्व घरांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या, शेव, चिवडा असे पदार्थ केले जातात.(सामना)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गोमाता पूजावसुबारस

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
मंगळवेढ्यात रतनचंद शहा यांची आज १०३ वी जयंती; दहा वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात येणार

दिव्यांग बांधवांनो! स्व.रतनचंद शहा यांच्या जयंतीनिमित्त ३०० दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप होणार; शहा कुटुंबीयांचा उपक्रम; नोंदणीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क

January 18, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 14, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 8, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

महिलांनो सावधान! बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने पळविले; सततच्या चोऱ्यामुळे प्रवाशांचा जीव लागला टांगणीला

December 29, 2025
इशारा! खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास आता पाच पट दंड होणार

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

December 11, 2025
Next Post
सोलापूर ब्रेकिंग : पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिसांवर आरोपीचा प्राणघातक हल्ला

मुलीचा विवाह करून न दिल्याने मुलीच्या वडिलांचे अपहरण; मंगळवेढ्यापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी केली सुटका

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा