टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शरद कॉलनी येथील जयंत महादेव चव्हाण हा बुधवार दि .५ मे रोजी सायं .६ वाजता वीज कडाडल्याचा धसका घेत जागीच मरण पावल्याची घटना एकवीरा माळ येथे घडली.
बुधवारी दुपारी तो काही कामानिमित्त डोंगरगाव रोड परिसरात गेला होता. यावेळी वीजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरूवात झाली.
पावसापासून बचाव करण्यासाठी एकवीरा माळावरील दर्लिंग मंदिर येथे जयंत चव्हाण व त्याचा मामा शिवाजी नांद्रेकर हे दोघे थांबले असता इतक्यात विजेचा मोठा आवाज झाला.
जयंत हा दिव्यांग असल्याने त्याने त्याचा मामा शिवाजी नांद्रेकर यास मिठी मारली यात तो जागीच मयत झाला. मृत्यूसमयी तो २५ वर्षाचा होते.
त्याच्या पश्चात आई वडील , एक भाऊ असा परिवार आहे . बँक ऑफ इंडिया शाखा मरवडेचे लिपिक शिवाजी नांद्रेकर यांचा तो भाचा होता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज