टीम मंगळवेढा टाइम्स ।
मराठा आरक्षण अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे वितरण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे
आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी बी.आर.माळी व तहसीलदार मदन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे घुले परिवाराकडे करण्यात आले.
सदर प्रसंगी घुले परिवारातील आस्था मनोहर घुले, जयदेव मनोहर घुले व ओमराजे मनोहर घुले यांना या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे लढा सुरू आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार महोदय यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती.
पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा मराठा समाजाची आरक्षण दाहकता माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे समाजाच्या या लढाईमध्ये मी नेहमीच समाज बांधवांच्या बरोबरीने असेन असा शब्द आमदार आवताडे यांनी यावेळी दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज