टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवीनिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून चांदीचे नाणे देण्यात येत आहे.
नुकताच संपन्न झालेला धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेटचा तपपूर्ती सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चांदीच्या नाणेचे अनावर करण्यात आले होते.
गुरूवार दि. १ फेब्रुवारी रोजी मार्केट यार्ड येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे व संचालिका विद्या जावीर यांच्या हस्ते उपस्थित सभासदांना चांदीचे नाणे वाटप करण्यात आले. सुरवातीला सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले.
संस्था स्थापनेपासून सभासदांना दरवर्षी लाभांश देत असून संस्थेच्या रौप्य महोत्सवनिमित्त यावर्षी आकर्षक चांदीचे नाणे प्रत्येक सभासदांना देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना लाभांश व भेटवस्तू देणारी मंगळवेढा तालुक्यातील एकमेव पतसंस्था असल्याचे चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे यांनी सांगितले.
याप्रसंगी गोकुळा जावीर, अक्काताई गोवे, शोभा गोवे, रंजना धनवे, पुष्पा भोजने, ज्योती इंगळे, अर्चना इंगळे, कल्पना लेंडवे, शुभांगी इंगळे, सविता जावीर, मनीषा शिंदे, उर्मिला वाकडे, सारिका ओमने, शोभा पवार, नागर पाटील, सुंदर दत्तु, पुजा वडतिले, सविता भोसले, संजीवनी पाटील, रत्नप्रभा माने यांचेसह इतर महिला सभासद उपस्थित होत्या.
तसेच धनश्री महिला पतसंस्थेचे मुख्य कार्यालय मंगळवेढा येथून सर्व सभासदांनी आपली केवायसी पुर्ण करुन चांदीचे नाणे हे भेटवस्तु घेऊन जावे असे आवाहनही सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी याप्रसंगी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज