mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे 2 हजार आलेत का? अन्यथा ‘अशी’ करा तक्रार!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे 2 हजार आलेत का? अन्यथा ‘अशी’ करा तक्रार!

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक कामकाज ठप्प असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे अनेक उद्योजक, कामगार, मजूर, गरीब वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्राने अशा लोकांना दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान योजनेतंर्गत ९.१३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार २५३ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर याची तक्रार सरकारने दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन करु शकता तसेच तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना हे कळवू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी सरकारचं अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जावून शोधू शकता. त्याशिवाय लाभार्थ्यांची यादी आणि ऑनलाईन अर्जदेखील दाखल करु शकता. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांची नवीन यादी या महिन्याच्या अखेर किंवा पुढील महिन्यात जारी करणार आहेत.

कशी कराल तक्रार?


तुम्ही थेट कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर – १५५२६१, पीएम किसान टोल फ्री – १८००११५५२६, पीएम किसान लँडलाइन नंबर ०११-२३३८१०९२, २३३८२४०१ त्यासोबत pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.

जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहायचं असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ही सुविधा ऑनलाइन देखील प्रदान केली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते.

शेतकऱ्यांना त्यासाठी pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल. या टॅबमध्ये शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल त्यांची नावेही राज्य / जिल्हावार / तहसील / गावानुसार पाहता येतील. यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याचीही माहिती मिळू शकेल.

याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारेही शेतकर्‍यांना माहिती मिळू शकते. याखेरीज पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात स्वत: ला अद्ययावत ठेवायचे असेल तर त्यांची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून आपण गुगल प्ले स्टोअरवरुन पंतप्रधान किसान मोबाइल अँप डाउनलोड करू शकता.

शेतकरी असूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही का?


मोदी सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान-किसान योजना लागू केली असेल पण काही लोकांसाठी योजनेत अटी घालण्यात आल्या आहेत. जे लोक या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील ते आधार पडताळणीतून उघड होईल. योजनेसाठी सर्व १४.५ कोटी शेतकरी कुटुंबे यासाठी पात्र आहेत. पती-पत्नी आणि १८ वर्षांपर्यंतची मुले एकच गणली जातील. ज्यांची नावे १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत भूमी अभिलेखात सापडतील ते योजनेस पात्र असतील.

खासदार, आमदार, मंत्री आणि महापौरांना याचा लाभ मिळणार नाही. भलेही ते शेती करत असतील म्हणून त्यांनी अर्ज केला असेल तर पैसे येणार नाहीत. मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / ड वर्ग कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केंद्र किंवा राज्य सरकारमधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला लाभ मिळणार नाही. जर अशा लोकांना फायदा झाला तर आधारमधून ते उघडकीस येईल.

व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील, आर्किटेक्ट जे शेती करत असतील तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. इन्कम टॅक्स भरणारे आणि १० हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही. जर कोणत्याही आयकर दात्याने योजनेचे दोन हप्ते घेतले असतील तर तो तिसऱ्यावेळी तो पकडला जाईल. कारण आधार पडताळणी होत आहे.

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


मंगळवेढा टाईम्स वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 75 88 214 814 वर 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
बापरे… सोलापुरात रात्रीत वाढले 17 नवे रुग्ण ; बाधितांची संख्या 360 वर

बापरे... सोलापुरात रात्रीत वाढले 17 नवे रुग्ण ; बाधितांची संख्या 360 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा