मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
संतांनी नेहमीच समाजातील सदगुणांची पाठराखण करत वाईट वृत्तीचा नाश यासाठी जनजागृती केली आहे. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे. हे समजावले असून समाजाला प्रगल्भ करण्याचे काम हरिदासाने म्हणजेच संतांनी केले आहे.
विश्वाच्या सुखासाठी संत नामदेवांनी विठ्ठलाकडे आपल्या पसायदानातून काय मागितले याविषयीचे विवेचन ह.भ.प.अॅड.जयवंत बोधले महाराज यांनी केले आहे.
मंगळवेढा येथील किल्ला भागातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे स्व. सौ. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या धनश्री प्रवचनमाला या पाच दिवसीय प्रवचन मालेत तिसऱ्या दिवशी विवेचन करताना बोधले महाराज म्हणाले,
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझियां सकलां हरिच्या दासा ।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
ही संत मंडळी सुखी असो ।।
संत नामदेव पांडुरंगाकडे मागणं घालतात की संतमंडळीला कल्पनेची बाधा होऊ नये. या कल्पनेच्या बाधेचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या समजुतीनुसार वेदांतातल्या मायेपासून संसारातल्या तापापर्यंत काहीही लावतात.
दोन प्रकाशमय दिवसातून केवळ अंधारकडे पाहतो ती दुःखाची दृष्टी आहे. आणी दोन अंधारमय दिवसातून केवळ प्रकाशमय दिवसाकडे पाहतो त्याची सुखाची दृष्टी आहे.
जिथे आकार आहे तिथे भांडण आहे आणि जिथे निराकार आहे तिथे भांडण नसते. जगात अनंत दुःख आहे. पण जेव्हा हे जगच एक कल्पना आहे हे समजून घेतले तर या जगातील दुःखे ही आपल्याला जाणवणार नाहीत. अनुकूल काळातही व प्रतिकुल काळातही कल्पनेची बाधा होऊ नये. जग सुखी असेल तर संत सुखी होतात.
संतांना सुखी व्हायचे असेल तर आधी जगाला सुखी व्हावे लागेल. म्हणूनच पांडुरंगाकडे मागणे मागताना संत नामदेव म्हणतात ‘ ही संत मंडळी सुखी असो ‘ संतांचे सुख हे समृद्धीवर अवलंबून आहे. जगाच्या कल्याणाचा कळवळा केवळ संतांच्या ठायी आहे.
दया, क्षमा, शांती, समाधान ही सारी जीवनसंपत्ती मिळवून देणाऱ्या हरिदास संतांना ‘आकल्प आयुष्य’ मिळावे. त्यांना अहंभावाचा उपसर्ग होऊ नये, अशी आपल्या पसायदानात नामदेवांची मागणी आहे.
यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, मनोहर कलुबर्मे, प्रा.शोभाताई काळुंगे, ज्ञानदेव जावीर, डॉ. सुभाष कदम, अॅड. बी.बी. जाधव,डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, सीमाताई काळुंगे, युवराज गडदे, प्रभाकर कलुबर्मे, बसवराज मोगले,
डॉ. भीमाशंकर बिराजदार, दत्तात्रय नागणे, अॅड. भारत पवार, अॅड. रमेश जोशी, हणमंत कोष्टी, प्रकाश काळुंगे, अशोक वाकडे, पांडूरंग भाकरे, शिवाजीराव नागणे, दत्तात्रय भाकरे, राकेश गायकवाड, राजेंद्रकुमार जाधव,
प्रा.विनायक कलूबर्मे, इंद्रजित घुले, धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज