टीम मंगळवेढा टाईम्स ।
फेडरेशन ऑफ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ संस्था व सहकार गौरव पुरस्कार 2022 अंतर्गत रूपये 501 ते 1000 कोटी ठेवी असलेल्या संस्था गटातून धनश्री मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेला व चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना देवून गौरविण्यात आले.
शिर्डी ता.अहमदनगर येथे शुक्रवार दि.13 जानेवारी रोजी पार पडलेल्या सहकार गौरव सोहळयात हा पुरस्कार वितरण करण्यात आला.
याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा सहकार संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी उपस्थितांना ऑनलाईन सहकार कायद्याविषयी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.
तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे संचालक सतिश मराठे यांनी केंद्रीय सहकार कायद्याविषयी मनोगतात मार्गदर्शन केले.
या पुरस्कार वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सहकारभारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे एम.डी.सुकेश झंवर, मल्टिस्टेट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष विरूपाक्ष अंकलकोटे-पाटील उपस्थित होते.
हा पुरस्कार स्विकारण्यासाठी धनश्री मल्टिस्टेटचे चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, व्हाईस चेअरमन युवराज गडदे, संचालक सतिश दत्तू, सरव्यवस्थापक रमेश फडतरे, घेरडी शाखेचे शाखाधिकारी बाळासाहेब टेकळे,
आंधळगाव शाखेचे शाखाधिकारी बबन पाटील, लक्ष्मी दहिवडीचे शाखाधिकारी प्रविण गांडुळे आदिजण उपस्थित होते.
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनात आणि संस्थेच्या संचालिका प्रा.शोभाताई काळुंगे व इतर संचालक मंडळ यांच्या नेतृत्वात धनश्री मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2011 साली संस्थेची स्थापना झाली असून संस्थेने 600 कोटी ठेवीचा टप्पा गाठला आहे. दैनंदिन व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकारात बदल घडवणारी संस्था म्हणून धनश्री मल्टिस्टेटकडे पाहिले जाते.
सामाजिक कार्यात संस्थेचा नेहमी पुढाकार असतो. विविध उपक्रमातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ग्राहकासाठी वेगवेगळया योजना राबवणे असो कि गरजूंना मदतीचा हात देणे असो यामध्ये संस्थेचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
संस्थेच्या ठेवी व इतर एकूणच कार्याची दखल घेवून फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पुणे यांच्या मार्फत सहकार गौरव पुरस्कारकरीता सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून निवड झाली होती. सहकार क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज