टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. गर्दी टाळण्यासाठी विविध कडक निर्बंध राज्य सरकारने लागू आहेत.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील एका राजकीय कार्यक्रमात चक्क कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून आले.
या सभेतील काही नेते व पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नसल्याचेही पहावयास मिळाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी दोन दिवसाच्या दौर्यावर आले होते.
शुक्रवारी दुपारी त्यांनी हुलजंतीत जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत मोहिते पाटील गटाचे सुरेश नेहतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, जर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात नियम पाळले जात नसतील तर सर्वसामान्य लोकांनीच नियम पाळावे का ? त्यांनीच दंड भरावा का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे गर्दी होत असल्याने दुकाने, मॉल व इतर सर्वकाही बंद करण्यात आले असतानाच नेत्यांच्या सभेत गर्दी होताना कोरोना पसरत नाही का असाही सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज