(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा)
शिखर बँक घोटाळ्यामध्ये खा.शरद पवार व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे मुख्य आरोपी आहेत.हाय कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यानंतरही ते सत्तेवर आले ही मोठी चूक आहे. घोटाळ्याचा विचार करता त्यांना ताबडतोब सत्तेवरुन खाली उतरायला सांगावे किंवा काढून टाकावे, अशी मागणी माजी आमदार डॉ.शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 50 सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव 2007 ते 2010 या काळामध्ये शिखर बँकेने केले होते. बँकेनेच त्यातील साखर कारखाने आजारी पाडले आणि त्यांनीच लिलाव मांडले.
आजारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून मदत करण्यासाठी प्रस्ताव पाठवा म्हणून राज्य सरकारला अनेकवेळा कळवले गेले. प्रस्ताव पाठवले असते तर निश्चितच मदत झाली असती.
कारखान्यांचे लिलाव करताना कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव 65 कोटी रुपयाला झाला, असे जाहीर केले. लिलाव घेणार्या कंपनीचे नाव गुरु कमोडिटी. या कंपनीची माहिती घेतली. कंपनीची वार्षिक उलाढाल 63 लाख रुपये, वार्षिक नेट प्रॉफीट 10 हजार रुपये आहे, अशा कंपनीने 65 कोटी रुपयांचा कारखाना विकत घेतला. त्यांना पैसे कोणी दिले? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे. अजित पवारांनी शिखर बँक मोडकळीस आणली. कन्नड कारखाना. जि. औरंगाबाद या कारखान्याचा लिलाव शिखर बँकेने 50 कोटी रुपयाला बारामती अॅग्रो कंपनीने घेतला.
काही महिन्यानंतर कारखान्याच्या मालमत्तेवर 120 कोटी रु. कर्ज शिखर बँकेतून घेतले. बारामती अॅग्रो कंपनी पवार परिवाराची आहे. यांनीच आपल्या कंपनीला मोठमोठी कर्जे घेऊन बँक मोडून खाल्ली, असा आरोप या निवेदनात करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज